🎉🇮🇳🇮🇳🇮🇳 WELCOME TO MDN 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎉

जतेत व्हॉइस ऑफ मिडियाच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 


★आजी, माजी आमदारसह सर्वपक्षीय नेते, कार्येकते, संस्थेचा पाठिंबा

पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा. पत्रकारितेत पाच वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा,  कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकां इतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने राज्यभर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.
जत येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर व्हॉइस ऑफ मीडिया संलग्न जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्याचे संपर्क प्रमुख दत्ता सावंत, जतचे अध्यक्ष राजू माळी, जतचे डिजिटल मीडिया अध्यक्ष नजीरभाई चट्टरगी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.


आंदोलनास  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार,भाजपचे ज्येष्ठ नेते विलासराव जगताप, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब, सरदार पाटील, राष्ट्रवादीचे नेते, माजी सभापती सुरेश शिंदे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील,सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुजयनाना शिंदे, स्वप्नील शिंदे,सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, माजी संचालक अभिजित चव्हाण, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, बालाजी बल्लारी, राहुल चंदनशिवे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे-पाटील,  भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, सद्दाम अत्तार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश माळी, माजी सभापती महादेव अंकलगी, रासपचे तालुकाध्यक्ष बंडू डोंबाळे, अखिल नगारजी, महाराष्ट्र कामगार सेनेचे 
प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे, जालिंदर व्हनमाने, बजरंग शिंदे, उद्धव ठाकरे सेनेचे नागनाथ मोटे, जत पंचायत समितीचे माजी सदस्य दिग्विजय चव्हाण, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी श्रीकृष्ण पाटील, सोमनिंग कोळी, अमर कोळी, जागर फौंडेशनचे अध्यक्ष परशुराम मोरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्रेयश  नाईक, चंद्रशेखर गोब्बी, जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष समाधान जगताप बजरंग शिंदे, काँग्रेसचे नेते आप्पाराया बिरादार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, राष्ट्रवादीचे सागर शिनगारे,  दीपक शिंगे, योगेश एडके, मैगुर शेख, महादेव हुचगौड, राहुल शिंदे, दीपक कांबळे, सागर चव्हाण यांनी पाठींबा दिला.
यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जत तालुकाध्यक्ष राजू माळी, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष नजीरभाई चटरगी, मनोहर पवार, मारुती मदने, सुनील घाडगे, हनुमंत शिंदे, संजय कोटगोड, मच्छिंद्र बाबर, सुभाष कोकळे, संतोष पोरे, महावीर अड्डीमणी, प्रमोद मेटकरी, बी.पी. बुद्धसागर, नारायण भोसले, विठ्ठल हेगडे, के.अजितकुमार, गुरुनाथ वाघमारे, बाबासो कांबळे, नागेश ऐवाळे, रमजान मुलाणी, हनमंत बाबर, प्रमोद क्षीरसागर, क्लाप्पा बालगाव, महेश हडपद, विजय धोत्रे, पांडुरंग कोहळळी आदी उपस्थित होते.


आंदोलनस्थळी प्रांताधिकारी जोगेंद्र कटयारे यांनी भेट देत निवेदन स्वीकारले. पत्रकारांच्या मागण्या शासन दरबारी पाठवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.



No comments:

अखिल भारतीय हिंदू महासभा यांच्यावतीने कोल्हापूर सी पी आर हाॅस्पीटल येथील डाॅ वैद्यकीय अधीक्षक यांना अपंग प्रमाणपत्र मिळावे याबद्दल निवदेन देण्यात आले*

दिनांक 12/11/24024 रोजी अखिल भारत हिंदू महासभा यांच्या कडुन  दिव्यांग अपंग प्रमाणपत्र वर्षभर कशाबद्दल बंद केले याचे निवेदन कोल्ह...

ads 728x90 B
Powered by Blogger.