गुन्हेगारी मोडीत काढण्या बरोबरच, पोलिसांची कार्यक्षमता वाढवण्यावर भर असणार आहे. आगामी काळात व्होवू घातलेल्या निवडणुका पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस दल कटिबध्द असेल, असा विश्वास नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केला. नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचं सांगली जिल्हा पोलीस विभागामार्फत स्वागत करण्यात आले. तर मावळते पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. डॉ. तेली यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना निरोप देण्यात आला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज सांगलीचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारला.
आगामी काळात निवडणुका होणार असून या निवडणुका पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलिस दल कटिबध्द आहे. गुन्हेगारी मोडीत काढणे त्यावर अंकुश ठेवणे, गुन्हेगारांच्या वर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करणे. वाहतूक व्यवस्थेचे नियमन करणे ह्या आमच्या प्राथमिक जबाबदाऱ्या असतील, अस सांगून तर पोलिस अधीक्षक संदीप घुगे पुढे म्हणाले, पोलिसांची कार्यक्षमता वाढवणे, पोलिसांच्या साठी कल्याणकारी उपक्रम राबवणे, सांगलीच्या गौरवशाली इतिहासात जे उपक्रम राबवले होते ते उपक्रम पुढे चालू ठेवण्यात येतील. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची पदोन्नत्तीने बदली झाली असून, त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. घुगे हे सांगली जिल्ह्याचे ४३ वे पोलिस अधीक्षक आहेत. डॉ. तेली यांची पदोन्नत्ती झाली असून त्यांची पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
No comments: