*माडग्याळमध्ये सरपंच व महिला सदस्यांकडून अवैद्य धंद्याच्या विरोधात मोहिम*
मटका अड्ड्यावर ठिय्या*
माडग्याळ:माडग्याळ ता. जत येथिल स्त्री शक्तींनी गावाच्या मध्यभागी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकत अड्डातच ठिय्या दिला. या प्रकाराने मटका घेणाऱ्या एजंटची मात्र चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी सरपंच सौ. अनिता माळी, उपसरपंच बाळासो सावंत, महिला सदस्या सौ. निर्मला कोरे, सौ. सविता सावंत, सौ. निकीता कांबळे, सौ. शोभा माळी, सदस्य महादेव माळी हे पोलीस येऊन कार्यवाही करेपर्यंत त्या ठिकाणावरून न हलण्याचा पवित्रा घेतला व ठिय्या दिला.
जत पुर्व भाग तसा दुष्काळी पट्टा असलेला भाग, पण या भागात अवैध धंद्यांचा मात्र कायमच सुकाळ असतो. जे कुठेही चालणार नाहीत ते अवैध धंदे जत व उमदी पोलीस ठाणे हद्दीत कोणत्याही अडचणीविना चालत असतात. माडग्याळ ही याला अपवाद नाही. माडग्याळमधील अवैद्य धंदे बंद करावेत अशी गेल्या कित्याक दिवसापासून मागणी आहे, तसे पोलिस ठाण्यांना पत्रव्यवहारदेखिल झालेली आहेत पण याकडे कायमच दुर्लक्ष करत गावात मध्यभागी दुकाने थाटण्याची कामे सुरूच आहेत.
यातूनच आज महिला सदस्यांनी आक्रमक भुमिका घेत आज मटका अड्ड्यावरच ठिय्या दिला. याउलट मटका एजंटनेच या महिला सदस्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. शेवटी महिलांनी पोलीस येऊन कारवाई केल्यावरच येथून हलणार असल्याचे पवित्रा घेतल्याने अखेर पोलिसांना येऊन एजंटला ताब्यात घेणे भाग पडले.
मटका अड्डा बंद करण्यास गेलेल्या महिला सरपंच व महिला सदस्यांना एंजटने 'तुम्ही पोलीसांना काय बोलवता मीच बोलावतो, त्यांने काही होत नाही आमचे सगळे मॅनेज असते' असे उध्दटपणे बोलले. त्यामुळे पोलीसांची देखील अवैद्य व्यवसायाविरोधात असलेल्या भुमिकेबद्दल संशय निर्माण होतात.
No comments: