🎉🇮🇳🇮🇳🇮🇳 WELCOME TO MDN 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎉

सांगली जिल्हा राष्ट्रीवादी काँग्रेस पार्टी ओबीसी आघाडीच्या सरचिटणीसपदी सिध्दू सलगर यांची निवड .



जत तालुक्यातील सनमडी येथील युवा नेते सिध्दू सलगर यांची सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)ओबीसी सेल आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली या निवडीचे पत्र सुनील पवार ( अध्यक्ष राष्ट्रीवादी काँग्रेस जत तालुका ) यांच्या हस्ते देण्यात आले . 
यावेळी  वैभव दादा पाटील ( जिल्हा अध्यक्ष ) , संजय कोळी जत तालुका उपाध्यक्ष , व इतर पदाधिकारी उपस्थित होते . 
सिध्दू सलगर हे सनमडी येथील रहिवासी असून ते राष्ट्रीवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सुनील पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात . त्यामुळेच त्यांना या पदावरती काम करण्याची संधी मिळाली आहे . 
यावेळी बोलताना सिध्दू सलगर म्हणाले की , मला सुनील पवार यांच्या मुळे  सांगली जिल्हा राष्ट्रीवादी काँग्रेस  पार्टी  ओबीसी आघाडीच्या सरचिटणीसपदी काम करण्याची जी जबाबदारी पक्षाने संधी दिलेली आहे त्या संधीचे सोने करू , पक्षाने दिलेली जबाबदारी व पक्ष वाढीसाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करू , हा पक्ष सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा व सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे . सांगली जिल्हा राष्ट्रीवादी काँग्रेस  पार्टी  ओबीसी आघाडी पार्टीला घवघवीत असे यश मिळवून देणे असल्याचे यावेळी सांगितले .

No comments:

अखिल भारतीय हिंदू महासभा यांच्यावतीने कोल्हापूर सी पी आर हाॅस्पीटल येथील डाॅ वैद्यकीय अधीक्षक यांना अपंग प्रमाणपत्र मिळावे याबद्दल निवदेन देण्यात आले*

दिनांक 12/11/24024 रोजी अखिल भारत हिंदू महासभा यांच्या कडुन  दिव्यांग अपंग प्रमाणपत्र वर्षभर कशाबद्दल बंद केले याचे निवेदन कोल्ह...

ads 728x90 B
Powered by Blogger.