जत तालुक्यातील येळवी येथील ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्था संचलित ओंकारस्वरूपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मैदानात तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगल्या.
क्रीडा युवक सेवा संचनालय, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सांगली व येळवी येथील ओंकारस्वरूपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.येळवीत प्रथमच ओंकारस्वरूपाने या स्पर्धा भरविल्या होत्या. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत विविध गटातील १८४ संघानी सहभाग नोंदविला होता. यात १४ वर्षांखालील मुलाच्या ४७ संघाने, मुलीच्या ३१ संघांनी, १७ वर्षांखालील मुलाच्या ४४ संघाने, मुलीच्या ३४ संघांनी तर १९ वर्षांखालील मुलाच्या १८ संघाने, Yourself १० संघांनी सहभाग नोंदविला.
ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक अंकलगी, येळवी ग्रामपंचायतचे सदस्य तथा ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्थेचे सचिव संतोष पाटील यांच्यासह ओंकारस्वरूपा टीमने अतिशय नेटके नियोजन या स्पर्धेसाठी केले होते. स्पर्धेसाठी चार मुख्य मैदाने तयार करण्यात आली होती. प्रेक्षकांना सर्व सामने पाहता यावीत यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. १८४ संघामध्ये सहभागी झालेली विद्यार्थी, त्यांचे क्रीडा प्रशिक्षक व स्पर्धा पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक यांनी ओंकारस्वरूपाने केलेल्या नियोजनाचे तोंडभरून कौतुक केले. ओंकारस्वरूपा संस्थेने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे नेटके नियोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दीपक अंकलगी व सचिव संतोष पाटील यांचा जत तालुका क्रीडा संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष एम.ए.शेख यांच्या हस्ते उत्कृष्ट नियोजनाबद्दल सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेचे उदघाटन जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील म्हाडाचे उपकार्यकारी अभियंता अनिल अंकलगी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जतचे तहसीलदार जीवन बनसोडे, माजी सभापती बाबासाहेब कोडग, पंचाक्षरी अंकलगी, जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, गटशिक्षणाधिकारी अन्सार शेख, येळवीच्या सरपंच सौ.आरतीताई अंकलगी, उपसरपंच विश्वास खिलारे,माजी उपसरपंच सुनील अंकलगी , सुनील साळे, सचिन माने, येळवी सोसायटीचे चेअरमन संतोष स्वामी, ज्ञानेश्वर आवटे, रविकिरण पवार, डॉ. विवेकानंद स्वामी, ओंकारस्वरूपाचे प्राचार्य भारत निळे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले,. मन, मेंदू आणि मनगट यांचा सुरेख मेळ साधत खेळला जाणारा कबड्डी हा महत्त्वपूर्ण खेळांपैकी एक मैदानी खेळ आहे. आजकाल सोशल मीडियाच्या नादाने विद्यार्थी मोठ्या संख्येने मैदानी खेळापासून दूर चालले आहेत हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. अशा स्पर्धांच्या आयोजनाने मैदानी खेळाप्रती विद्यार्थ्यांच्यात गोडी निर्माण करणे आवश्यक असल्याचं याप्रसंगी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हाडाचे उपकार्यकारी अभियंता अनिल अंकलगी यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात मैदानी खेळाकडे होणाऱ्या दुर्लक्षाचे परिणाम सर्वांना भोगावे लागणार आहेत. शालेय जीवनात मैदानी खेळाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
■ स्पर्धेतील विजेते संघ-
१४ वर्षे वयोगट (मुले) विजयी संघ :
प्रथम क्रमांक श्री सिद्धनाथ विद्या मंदिर, अंकले ,द्वितीय क्रमांक:-सिद्धनाथ हायस्कुल & ज्युनि. कॉलेज वाळेखिंडी .
१५ वर्षे वयोगट (मुली) विजयी संघ :
प्रथम क्रमांक:- जिल्हा परिषद शाळा, काराजनगी, द्वितीय क्रमांक- संत तुकाराम विद्या मंदिर, हिवरे ,
१७ वर्षे वयोगट(मुले)विजयी संघ:
प्रथम क्रमांक:-एम .व्ही. • हायस्कुल & ज्युनि. कॉलेज, उमदी, द्वितीय क्रमांक:-ओंकार स्वरुपा इंग्लिश मिडियम स्कुल अँड ज्युनि. कॉलेज येळवी.
१७ वर्षे वयोगट (मुली) विजयी संघ :
प्रथम क्रमांक:- राजे रामराव महाविद्यालय, जत, द्वितीय क्रमांक- श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कुल वळसंग.
१९ वर्षे वयोगट (मुले) विजयी संघ :-
प्रथम क्रमांक:-राजे रामराव महाविदयालय, जत, द्वितीय क्रमांक:- गजानन हायस्कुल. & ज्युनि. कॉलेज जाडरबोबलाद .
१९ वर्षे वयोगट (मुली) विजयी संघ :
प्रथम क्रमांक:-एस. व्ही. आर. डी शेगाव .
द्वितीय क्रमांक:-चंद्रशेखर गोबी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज तिकोंडी.
No comments: