🎉🇮🇳🇮🇳🇮🇳 WELCOME TO MDN 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎉

जत आरोग्य विभागाकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांचे हस्ते करण्यात आले

 जत शहरातील विठ्ठल नगर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या प्रारंभ आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते महाराष्ट्र दिना दिवशी  करण्यात आला.




या वेळी डॉ ऐश्वर्या माळी,वैद्यकीय अधिकारी डॉ संजय बंडगर तालुका आरोग्य अधिकारी डॉ भारती पाटील,वैद्यकीय अधिक्षक,डॉ तब्बसुम फरास 

डॉ जोस्तना अदाटे, गटविकास अधिकारीअपासाहेब सरगर,तहसीलदार जिवन बनसोडे, मा.न.प.सभापती  परशुराम मोरे, युवा नेते कुमार साळे,अरुणसाळे,रामदास भोसले,जत सर्कल भारत काळे,कोतवाल संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष कोळी विठ्ठल नगर भागातील ग्रामस्थ सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आरोग्य कर्मचारी व आशासेविका उपस्थित होत्या. राज्यभरात या योजनेंतर्गत असणाऱ्या दवाखान्याचे ई- उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या दवाखान्यात सर्व उपचार मोफत मिळणार असून, मोफत तपासणी गर्भवती मातांसंदर्भात सर्व आरोग्य सुविधा मिळणार आहेत. ही योजना राज्यभरात राबविण्यात येत आहे


 तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे कोरोना काळात यांचे फार मोठे योगदान आहे तसेच पुढे आरोग्याविषयी असे अनेक उपक्रम फाउंडेशन मार्फत राबविण्यात आले आहेत तसेच आरोग्याचा समाजाचे जाण असणारा नेता या भागात आहे म्हणजे आम्हाला काळजी करण्याची गोष्ट नाही 


राज्याच्या आरोग्य विभागाकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेची सुरवात १ मेपासून राज्यभरात करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून जत नगरपरिषद जवळील विठ्ठल नगर भागात आरोग्य विभागाच्या जागेत या योजनेंतर्गत दवाखान्याची निर्मिती करण्यात आली. या दवाखान्यामध्ये सर्व उपचार व तपासण्या मोफत केल्या जाणार असून, औषधे मोफत पुरविली जाणार आहेत. गरोदर मातांची नियमित तपासणी व त्याचबरोबर लसीकरण आदी आरोग्यसेवा पुरविल्या जाणार आहेत. गरीब गरजूंसाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. दुपारी दोनपासून तर रात्री दहापर्यंत हा दवाखाना सुरू असणार आहे. आरोग्य केंद्रामध्ये एक वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), एक आरोग्यसेवक, एक आरोग्यसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, एक शिपाई असे कर्मचारी असणार आहेत. या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे अवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय बंडगर यांनी केले आहे.





No comments:

अखिल भारतीय हिंदू महासभा यांच्यावतीने कोल्हापूर सी पी आर हाॅस्पीटल येथील डाॅ वैद्यकीय अधीक्षक यांना अपंग प्रमाणपत्र मिळावे याबद्दल निवदेन देण्यात आले*

दिनांक 12/11/24024 रोजी अखिल भारत हिंदू महासभा यांच्या कडुन  दिव्यांग अपंग प्रमाणपत्र वर्षभर कशाबद्दल बंद केले याचे निवेदन कोल्ह...

ads 728x90 B
Powered by Blogger.