🎉🇮🇳🇮🇳🇮🇳 WELCOME TO MDN 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎉

जत मध्ये महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचा जल्लोषात मिरवणूक ; आत्मपरीक्षण करू: प्रकाशराव जमदाडे

 जत मध्ये महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचा जल्लोषात मिरवणूक 

आमदार विक्रम सिंह सावंत व राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे यांनी धरला ठेका


जत: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर वसंत दादा विकास आघाडीची एक हाती सत्ता आली .या निकालानंतर जत मध्ये महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली.हि मिरवणूक,चिनगी बाबा मंदीर,गांधी चौक, बसस्थानक परिसर , बाजार समिती आवारात,सांगता झाली, या मिरवणुकीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे, त्याचबरोबर विकास सोसायटी मधून विजय झालेले सुजय शिंदे ,स्वप्निल शिंदे विजय झालेले बिरु शिंदे ,नामप्र मध्ये विजय झालेले बाबासाहेब माळी ,महिला गटातून विजयी झालेले शकुंतला बिराजदार, आर्थिक दुर्बल गटातून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पाराया बिराजदार, पिरप्पा माळी, आकाश बनसोडे, भूपेंद्र कांबळे, मुन्ना पकाली, राजेंद्र जेऊर, परशुराम मोरे, साहेबराव कोळी ,दिलीप सोलापूर, महादेव पाटील, अशोक बन्नेनवर, महादेव कोळी, सलीम पाच्चापुरे ,निलेश बामणे ,महादेव साळुंखे ,परशुराम चव्हाण ,अण्णासाहेब गायकवाड , मारुती पवार,नाथा पाटील, सलीम नदाफ, युवराज निकम, अतुल मोरे, गणेश गीडे, संतोष भोसले ,संतोष मठपती, बाबा शिंदे,विनय अंयंगार, महादेव अंदानी, पिंटू पाथरुट, अशोक धोत्रे, आप्पा पवार ,मेहबूब गंवडीं, लक्ष्मण कदरे, जालिंदर व्हनमाने, पापा हुजरे, वहिब मुल्ला, बाबासाहेब पाटील, मल्लेश कत्ती, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय सावंत ,समाधान शिंदे, सागर शिनगारे ,शफिक इनामदार, यश सावंत, सतीश कलाल शिवकुमार तंगडी,शिवा गुजरे, विनायक माळी,गोटु पाथरुट, सईसाब नदाफ,दत्ता सुर्यवंशी, विकास माने, मिथुन माने, बाबासाहेब साळुंखे, विलास काळे,यांच्यासह सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संग्राम जगताप यांना पराभवाचा धक्का : बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार विलासराव जगताप यांचे नातू संग्राम जगताप यांना पराभवाचा जोरदार धक्का बसला. त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सदस्य दिग्विजय चव्हाण, जत विकास सोसायटीचे चेअरमन मोहन कुलकर्णी यांना परवाचा धक्का बसला.
अन कार्यकर्त्याच्या पायात घातली चप्पल: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर जोपर्यंत नाना शिंदे हे  विजयाचा  गुलाल खेळत नाहीत. तोपर्यंत चप्पल घालत  नाही. असा पण नाना शिंदे यांचे कट्टर कार्यकर्ते विकी शिंदे यांनी केला होता. नाना शिंदे हे विजय होताच विकी शिंदे यांच्या  पायात नाना शिंदे यांनी चप्पल घालत विकी शिंदे यांचा पण पुर्ण केला.

 

आमदार विक्रम सिंह सावंत राष्ट्रवादी नेते सुरेश शिंदे यांनी धरला ठेका: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जत मधून महाविकास आघाडीचे सहाच्या सहा उमेदवार विजयी झाले. व जत मध्ये विजयी उमेदवारांचे जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे यांनी ठेका धरत विजयात सामील झाले. आमदार विक्रम सिंह सावंत यांचा आनंद ओसांडून वाहत होता.विजयी मिरवणुकीत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी ठोकलेला शड्डू सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.




आत्मपरीक्षण करू: प्रकाशराव जमदाडे परिवर्तन पॅनेलचे नेते प्रकाशराव जमदाडे म्हणाले, या निकालाचे आत्मपरीक्षण आम्ही नक्कीच करू. परंतु येथे सत्ताधाऱ्यांनी वारेमाफ पैशाचा वापर केला. तसेच आमचे पॅनेल शेवटच्या टप्यात झाले. मतदारापर्यंत पोहचण्यास वेळ झाला. तरीही परिवर्तनाची गरज आम्ही पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. पण ज्या मतदारांनी मोठ्या संख्येने आमच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्या उमेदीने शेतकन्यांसाठी आम्ही ताकदीने काम करत राहू .खासदार संजयकाका पाटील, विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देवू असे जिम बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे म्हणाले


No comments:

अखिल भारतीय हिंदू महासभा यांच्यावतीने कोल्हापूर सी पी आर हाॅस्पीटल येथील डाॅ वैद्यकीय अधीक्षक यांना अपंग प्रमाणपत्र मिळावे याबद्दल निवदेन देण्यात आले*

दिनांक 12/11/24024 रोजी अखिल भारत हिंदू महासभा यांच्या कडुन  दिव्यांग अपंग प्रमाणपत्र वर्षभर कशाबद्दल बंद केले याचे निवेदन कोल्ह...

ads 728x90 B
Powered by Blogger.