जत तालुक्यातील येळवी येथे वादळी वाऱ्याने विजेची तार तुटून अंगावर पडल्याने मेंढीसह दोन शेळ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास येळवी भागात जोराचा वादळी वारे सुटले. ईश्वर डोंबाळे व त्यांचा मुलगा पांडुरंग डोंबाळे हे शेतातच शेळ्या व मेंढया चारत होते. सहाच्या सुमारास पाऊस व वादळी वारे सुरू झाल्याने ईश्वर डोंबाळे हे त्यांच्या शेळ्या व मेंढया घेवून घराकडे जात असताना अचानक वादळी वाऱ्याने विजेची तार तुटली व शेळ्या व मेंढ्याच्या अंगावर पडली. यात एक मेंढी व दोन शेळ्यांचा विजेच्या धक्याने जागीच मृत्यू झाला. सुदैवाने ईश्वर डोबांळे हे बचावले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील वंदना सचिन माने, कोतवाल बाळासो चव्हाण, वायरमन सहाय्यक बापू चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी ईश्वर डोंबाळे यांना शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
No comments: