🎉🇮🇳🇮🇳🇮🇳 WELCOME TO MDN 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎉

जत - येळवी येथे उभारण्यात येत असलेल्या श्री संत बाळूमामा मंदिराला माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिली भेट

 



बाळूमामा देवस्थानच्या माध्यमातून समाजकार्य हाती घ्या- महादेव जानकर



जत तालुक्यातील येळवी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकसहभागातून श्री संत बाळूमामा देवस्थान कमेटीच्या वतीने श्री संत बाळूमामांचे निसर्गरम्य मंदिर उभारले जात आहे. मंदिराच्या माध्यमातून अध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक कार्ये हाती घ्यावीत असे आवाहन रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.

येळवी येथे उभारण्यात येत असलेल्या मंदिरास महादेव जानकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत रासपचे जिल्हाध्यक्ष आप्पासो थोरात, तालुकाध्यक्ष बंडू डोंबाळे, हरिबा दुधाळ, किसन टेंगले, येळवीचे गणाध्यक्ष भाऊसो खरात आदी उपस्थित होते. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पायाभरणी करण्यात आली. तुकाराम सुतार व विनोद शेळके यांच्या टीमने बांधकामाची जबाबदारी घेतली असून अवघ्या सहा दिवसात मंदिराचा पायाभरणी व इमारतीचा ढाचा उभारण्यात आला आहे. महादेव जानकर यांनी कामाचे व नियोजनाचे कौतुक केले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मारुती मदने, अध्यक्ष नवनाथ काळे, संदीप मदने, बाळासो तांबे यांनी महादेव जानकर यांचा सत्कार केला. यावेळी मारुती मदने यांनी देवस्थान कमेटीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची व उभारण्यात येत असलेल्या मंदिराची माहिती दिली.

महादेव जानकर म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे. संतांच्या भूमीत अनेक महान संत होवून गेले त्यामध्ये श्री संत बाळूमामा एक होवून गेले. संतांनी वेगवेगळ्या माध्यमातून समाजजागृती केल्याने त्यांचे कार्य व नाव अजरामर झाले आहे. संतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केल्यास मानसिक समाधान तर भेटतेच त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. श्री संत बाळूमामा यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्री संत बाळूमामा श्रद्धास्थान आहेत. येळवी येथे उभारण्यात येत असलेले मंदिर समाजाला दिशा देण्याचे काम करेल असा विश्वास जानकर यांनी व्यक्त करत मंदिराला सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.




No comments:

अखिल भारतीय हिंदू महासभा यांच्यावतीने कोल्हापूर सी पी आर हाॅस्पीटल येथील डाॅ वैद्यकीय अधीक्षक यांना अपंग प्रमाणपत्र मिळावे याबद्दल निवदेन देण्यात आले*

दिनांक 12/11/24024 रोजी अखिल भारत हिंदू महासभा यांच्या कडुन  दिव्यांग अपंग प्रमाणपत्र वर्षभर कशाबद्दल बंद केले याचे निवेदन कोल्ह...

ads 728x90 B
Powered by Blogger.