जत - सोसायटीची सत्तर टक्के वसुली ; लवकरच नवी इमारत साकारणार : चेअरमन भैय्या कुलकर्णी, अण्णाप्पा माळी
जत शहरासह पाच गावांचे कार्यक्षेत्र असणारी जत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी गेल्या वर्षभरापूर्वीच बंद पडते की काय अशी अवस्था असतानाच या संस्थेवर नव्याने आलेल्या संचालक मंडळाने मोठी कामगिरी करत सहकारात आदर्श निर्माण केला आहे. गेल्या पंधरा वर्षापासून 'ड' वर्गात असणाऱ्या सोसायटीने यंदा बेट सत्तर टक्के वसुली करतानाच बँक पातळीवर ती शून्य टक्क्यावर आणली आहे. लवकरच संस्थेची नवी इमारत आणि शेतकरी सभासदांना खते, बियाणे, औषधे माफक दरात देण्यात येणार असल्याची माहीती चेअरमन मोहनमैय्या कुलकर्णी व व्हा. चेअरमन अण्णाप्पा माळी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
जत बाजार समितीच्या आवारात असणारी जत विकास सोसायटी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात होती. यामुळे येथे शेतकऱ्यांना अनेक प्रकरणे मंजुरी होताना अडचणी निर्माण होत होत्या. शिवाय मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिल्याने शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून अर्थपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु गेल्या वर्षी चेअरमन मोहन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली एकहाती येथे नवे संचालक मंडळ अस्तीत्वात आले. या संचालक बोर्डानि शेतकऱ्यांना दिलेल्या अश्वासनांच्या पूर्तीसाठी झपाट्याने कामाला सुरूवात केली.
सुरुवातीच्या अवघ्या सात ते आठ महीन्यात संस्थेने चाळीस टक्के थकबाकी वसुली केली.त्यानंतर हळूहळू शेतकरी सभासदांना मार्गदर्शन आणि संस्थेचे महत्व पटवून देत मार्च अखेर ही वसुली सत्तर टक्कयावर नेली. यामुळे यंदा पहिल्यांदाच ही संस्था बैंक पातळीवरच्या वसुलीत शुन्य टक्यावर आली आहे. पाच गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या या संस्थेकडे २२८४ सभासद आहेत. संस्थेने आजमितीस अल्प मुदतीत सुमारे चार कोटी कर्ज वितरण केले आहे. दीर्घ मुदतीत ३४ लाख तर मध्यम मुदतीत ८४ लाख कर्जाचे वाटप केले. हे करताना मेंबर लेवलची वसुली ७५ टक्के करण्यात आली आहे. यामुळे ही संस्था आजरोजी सुस्थितीत आली आहे. गेल्या वर्षभरात अतिशय पारदर्शी कारभार करण्यात संस्थेला यश आले आहे.
दरम्यान, हे करताना जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे व मन्सूर खतीब यांच्या सहकार्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि अधिकची कर्जे देण्याचे काम करण्यात आले. तसेचे ओटीएस योजनेच्या माध्यमातून २१ शेतकऱ्यांना लाभ दिला. यात संस्थेकडे ७१ लाखांची वसुली जमा झाली आता ओटीएसची मुदत जूनपर्यंत वाढवण्यात आल्याने संचालक बोर्डाने सत्तर टक्क्यांची वसुली किमान ९५ टक्यापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. गतवर्षी हीच वसुली अवधी अठरा टक्के होती.
तसेच जिल्ह्यात पहिल्यांदाच ६० लाखांचे हार्वेस्टींग मशिन जत सोसायटीच्या माध्यमातून देण्यात आले. अनेक शेतकऱ्यांना आता या सोसायटीचा फायदा होत आहे. तसेच संस्थेसाठी स्वमालकीची नवी इमारत आणि खते, औषधे, बियाणे हा विभाग सुरू करून शेतकरी सभासदांना माफक दरात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही कुलकर्णी व माळी यांनी सांगितले.
सोसायटीने वर्षभरात केलेल्या या कामगिरीमुळे येथे जिल्हा बँकेचे एटीएम तसेच वॉटर एटीएमही। देण्यात येणार आहे. त्याच बरोबर जिल्हा बँकेच्या माध्यमातून पाच गावातील सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी गाय, म्हैस, शेळीपालन, कुकुटपालन यासाठीही कर्जे उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली आहे. वर्षभरातील या कामासाठी बँकेचे अधिकारी नामदेव कांबळे, वसंत माने, जयप्रकाश पोतदार यांनीही मेहनत घेतली आहे.
No comments: